खानापूर तालुक्यातील नंदगड गावातील शासकीय प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानात पाणी शिरल्याने संपूर्ण मैदान जलमय झाले,
मैदानात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे . लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांच्या याबाबत निदर्शनास आणून देखील कोणताही उपयोग झाला नाही, लैला शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष सदानंद पाटील याची भाजपचे आमदार विठ्ठल हालगेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. पीडीओ सागरकुमार बिरादार यांच्यासोबत त्यांनी शाळेच्या मैदानाची पाहणी केली . १५ ऑगस्ट पर्यंत शाळेच्या मैदानात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याचे सांगितले . शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पाणी सोडावे, या वेळी शाळा सुधारणा समितीचे सदस्य, पंचायत अध्यक्ष आदी उपस्थित होते.


Recent Comments