खानापूर तालुक्यातील हेब्बाळजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एक तरुण जखमी झाला. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमी तरुणाला उपचार मिळवून देण्यासाठी सहकार्य केले.

नंदगड येथील ज्ञानेश्वर संदीप नाईक यांची दुचाकी हेब्बाळजवळ घसरल्याने ते अपघातात जखमी झाले. याची माहिती मिळताच अरविंद पाटील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमीला खानापूर सार्वजनिक रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार मिळवून दिले.

अधिक उपचारांची गरज असल्याने ज्ञानेश्वर यांना बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी अरविंद पाटील यांनी वैयक्तिक पुढाकार घेत मदत केली. त्यांच्या तत्पर सहकार्याचे जखमीच्या कुटुंबीयांसह नागरिकांनी कौतुक केले.


Recent Comments