महाराष्ट्रातील घाटात सुरू असलेल्या पावसामुळे विजयपूर जिल्ह्यातील आलमट्टी धरणातून विसर्ग 1.50 लाख क्युसेक झाला आहे. सकाळी 1.25 लाख क्युसेक असलेला विसर्ग आता दुपारी 2.30 वाजता 1.50 लाख क्युसेकवर नेण्यात येणार असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले.
आलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांनी नारायणपुर धरणाला सतर्कतेचा संदेश पाठवला आहे, नारायणपुर धरणाच्या अधिकाऱ्यांनी सतर्क असल्याचा संदेश पाठवला आहे. यादगिरीमध्ये पुराचा धोका आहे. नागरिकांना कृष्णा नदीकाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


Recent Comments