महिलांनी समाजासाठी वेळ द्यावा. या काळात एकमेकांमधील मतभेद विसरून संघटित व्हायला हवे. महिला संघटित झाल्यास समाजसुधारणा शक्य असल्याचे मत प्रसिद्ध गायिका डॉ. राजेश्वरी हिरेमठ यांनी व्यक्त केले. अंजनादेवी महिला मंडळाच्या वतीने आज अंजनेय नगर येथील अनुभव मंडपात आषाढ महिन्यानिमित्त अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . गायिका डॉ. राजेश्वरी हिरेमठ यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
यावेळी , राजेश्वरी हिरेमठ यांनी , महिलांनी आपली दैनंदिन कामे उरकल्यानंतर जो मोकळा वेळ मिळतो त्याचा उपयोग समाजासाठी करावा. या काळात एकमेकांमधील मतभेद विसरून संघटित व्हायला हवे, असे त्या म्हणाल्या . अंजनादेवी महिला मंडळाच्या अध्यक्षा लता सिंग या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी सादर केलेले ‘आषाढ विचार’ हे नाटक गाजले. आषाढ महिन्याचा एक भाग म्हणून सर्व सदस्यांनी गुल्लव्वा, बसवण्णा आणि पांडुरंग पूजा अनोख्या पद्धतीने केली.

या कार्यक्रमात अंजनादेवी महिला मंडळाच्या उपाध्यक्षा ललिता हुगार, सचिव विजयालक्ष्मी पाटील, अमृता हावळ , प्रभा हादिमनी, जयश्री दुग्गानी भाग्यश्री भैरप्पनावर आदी उपस्थित होते. प्रभा पाटील यांनी प्रार्थना केली. सुमित्रा कुलकर्णी यांनी गीता कावेरी यांचे स्वागत केले.


Recent Comments