Belagavi

ॲलर्जीचा आजार बरा करणे आव्हान : प्राचार्य डॉ. एन.एस. महंतशेट्टी

Share

लहान मुलांमधील ॲलर्जीकडे दुर्लक्ष करू नका, त्याचा विपरीत परिणाम त्यांच्यावर होण्याची शक्यता असते, शिवाय ते घातक ठरू शकते. म्हणून, ॲलर्जी टाळण्यासाठी प्रभावी उपचार घेणे गरजेचे आहे, ॲलर्जीचा आजार बरा करणे हे आव्हान बनले आहे, अशी प्रतिक्रिया जेएनएमसीचे प्राचार्य डॉ. एन.एस. महंतशेट्टी यांनी व्यक्त केली.

काहेर, जेएनएमसी मेडिकल कॉलेज आणि डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या इ अँड टी विभागाच्यावतीने ‘इंटिग्रेटेड अप्रोच टू द मॅनेजमेंट ऑफ ऍलर्जिक रायनिटिज’ या विषयावर आयोजिण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. ऍलर्जी या विषयावर मार्ग्ददर्शन देताना प्रा.महंतशेट्टी म्हणाले, ऍलर्जी हा एक जुनाट आजार आहे. संशोधन आणि नवीन औषधांची उपलब्धता असूनही तो बरा करणे हे एक आव्हान आहे. त्यामुळे केवळ ॲलोपॅथीच नाही तर आयुर्वेद आणि होमिओपॅथीसारख्या पर्यायी औषधांचाही विचार केला जातो, तथापि, ॲलोपॅथीमध्ये विविध औषधे उपलब्ध आहेत ज्यांचा रुग्णाची काळजी घेण्यासाठी योग्य प्रकारे वापर केला पाहिजे.

रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. (कर्नल) एम दयानंद यांनी, जुनाट आजारांवर प्रभावी उपचार देण्यासाठी संशोधन केले पाहिजे. संशोधनासाठी पुरेसा पैसा असून तो समाज निरोगी ठेवण्यासाठी योग्य मार्गाने वापरला पाहिजे, असे सांगितले.

ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र मेटगुडमठ यांनी प्रास्ताविक केले.डॉ. एन.डी.झिंगाडे, डॉ. मुकुंदा उडचणकर, डॉ. सविता अंगडी, डॉ. राजेश पवार, डॉ. व्ही.एम. पट्टणशेट्टी, डॉ. आरिफ मालदार आदी उपस्थित होते. डॉ. नितीन अंकले आणि डॉ. प्रशांत पाटील यांनी सूत्रसंचनलन तर डॉ. शमा बेला यांनी आभार मानले.

Tags: