बेळगाव तालुक्याच्या मळेकरणी देवस्थानात पशुबळी बंदी करण्यात आली हि बाब कौतुकास्पद आहे असे मत जागतिक प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी व्यक्त केले.
आज बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, राज्यातील विविध ठिकाणी होणाऱ्या यात्रांमधील पशुबळीवर बंदी घालण्यात यावी, धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर होणारी पशुबळी प्रथा बंद करण्यात यावी, यावर राज्य सरकारने बंदी घालावी, अशी मागणी त्यांनी केली.


Recent Comments