ANIMAL

कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराचे रक्षण

Share

बेळगाव तालुक्यातील बामणवाडी गावाजवळ कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मोराची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली .

बामणवाडी गावातील तरुण काम आटोपून गावात येत असता त्यांना कुत्र्यांनी हल्ला केलेला मोर दिसला, श्री हरी पायण्णाचे आणि गौतम कणबरकर यांनी जखमी झालेला मोर पाहिला आणि त्याची काळजी घेतली आणि शांताई आश्रमात आणले.

यावेळी माजी महापौर विजय मोरे यांनी संतोष दरेकर याना बोलावून मोरावर उपचार करून , त्यानंतर मोराला वन कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले .

Tags: