Belagavi

मंदिरे ही संस्कार दृढ करणारी केंद्रे आहेत – गुरुसिद्ध महास्वामी

Share

मंदिरे ही संस्कार दृढ करणारी केंद्रे आहेत असे मत कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी यांनी व्यक्त केले. रामतीर्थ नगर, बेळगाव येथील एस. एस. एस. संघाच्या कार्यसिद्धी अंजनेय मंदिरात तिसरा वर्धापन दिन आणि हनुमान जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी बोलताना कारंजी मठाचे गुरुसिद्ध महास्वामी म्हणाले, केवळ हात जोडले म्हणून देवाला योग्यता मिळत नाही. शरीर, मन आणि आत्मा यांची शुद्धता असली पाहिजे. याव्यतिरिक्त, इतरांच्या आनंदाचे आपण कारण बनले पाहिजे. शक्य तितकी शांतता राखली पाहिजे. याठिकाणी ग्रंथालये आणि मंदिरे आहेत याचा योग्य उपयोग करून घेण्याचे आवाहन स्वामींनी केले.

यावेळी स्वामींचा ७६ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात माजी महापौर एम. बी. निर्वाणी, नगरसवेक हनुमंत कोंगाली यांचीही समयोचित भाषणे झाली. यावेळी यादव फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश यादव, सचिव मनोहर काजूगर, विलास केरूर, सदस्य मल्लप्पा दंडिनवर आदी उपस्थित होते.

Tags: