सिंदगीमध्ये आज काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी रोड शो केला. यावेळी हुबळी हत्याकांडावरून काँग्रेस नेत्यांना लक्ष्य करत हे कृतयु स्लिम, फय्याज आणि सलमान कडूनच होऊ शकते, कल्लाप्पा मल्लप्पा नावाचे लोक अशी कामे करू शकत नाहीत असे विधान त्यांनी केले.
आम. बसनगौडा पाटील यत्नल म्हणाले, कर्नाटकाच्या गृहमंत्र्यांनी हे प्रकरण वैयक्तिक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या वक्तव्याचा बसनगौडा पाटील यांनी खरपूस समाचार घेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर टीका केली.
पंचमसाली समाजाची मते मागण्यासाठी तुमची नैतिकता आहे का? असा सवाल यत्नाळांनी उपस्थित केला. मंत्री जी परमेश्वर यांनी हिरेमठ खून प्रकरणावर केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेत हि घटना तुमच्या मुलीसोबत झाली असती तर तुम्ही कशी प्रतिक्रिया दिली असती असा सवाल यत्नाळांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात केवळ देशवासियांना ट्रेलर दाखविला आहे. आता भविष्यात पूर्ण चित्रपट पाहायचा असेल तर भाजपाला बहुमत द्या असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसकडून घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला असून जेव्हा डॉ.बी.आर.आंबेडकरांचा मृत्यू झाला त्यावेळी काँग्रेसने अंत्यसंस्कारासाठी जागा आणि पैसा दिला नाही, नेहरू आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी स्वतःसाठी भारतरत्न पुरस्कार मिळवला. असा आरोप बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला.


Recent Comments