Banglore

भाजपला 200 पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत : सिद्धरामय्या

Share

भाजपला लोकसभेच्या केवळ 200 जागासुद्धा जिंकणे अवघड असल्याची माहिती त्यांनी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यामुळेच 400 जागा जिंकू, असे सांगत ते रणनीती राबवत असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

म्हैसूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, भाजपने काही विकास केला असता तरच ट्रेलर दाखवता आला असता. पण भाजपकडे विकास शून्य आहे. यासाठी ट्रेलर दाखवणे कसे शक्य आहे?, अशी टीका त्यांनी केली.

यावेळी त्यांनी काहीही केले तरी त्यांना 200 पेक्षा जास्त जागा जिंकता येणार नाहीत हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहीत आहे. त्यांच्या पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात त्यांना याची खात्री पटली आहे. आपले अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान 400 जागा जिंकणार असल्याचे सांगत असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष यावेळी कर्नाटकात 20 जागा जिंकेल. यावेळी भाजपच्या डावपेचात जनता सहजासहजी फसणार नाही. याशिवाय यावेळी लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला तर तेच मूर्ख बनतील असा दावा त्यांनी केला.  इतर पक्षातील लोक काँग्रेस पक्षात येण्याची शक्यता आहे का, या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना अनेकजण काँग्रेस पक्षात येण्यास उत्सुक आहेत. काँग्रेसच्या विचारधारेशी सहमत असलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत आहे, असे ते म्हणाले.

Tags: