कायदा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यात आणि वकिलांच्या ज्ञानात भर पडण्यात म्यूट कोर्ट स्पर्धांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्यायाधीश अनिल कट्टी यांनी केले.

बेळगावातील के. एल. एस. सोसायटीच्या आरएल लॉ कॉलेजमध्ये 14व्या एम. के. नंबियार राष्ट्रीय स्तरावरील अभिरूप न्यायालय (म्यूट कोर्ट) स्पर्धेचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. न्या. अनिल कट्टी पुढे म्हणाले की, म्यूट कोर्टासारख्या स्पर्धा कायदा आणि विज्ञान यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. अशा स्पर्धा विधी शिक्षणाचा तसेच वकिलांचा दर्जा उंचावण्याचा अपरिहार्य भाग आहेत.

अध्यक्षीय भाषणात केएलएस सोसायटीचे सचिव व्ही. जी. कुलकर्णी यांनी देशाच्या विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. एम. के नंबियार म्यूट कोर्ट स्पर्धा ही दक्षिण भारतातील सर्वात पारदर्शक आणि प्रतिष्ठित स्पर्धा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार म्हणाले की, आर. एल लॉ कॉलेजने समाजाच्या सर्व क्षेत्रात सर्वांगीण अखंडता राखली आहे आणि कॉलेजची ओळख प्रेक्षकांना करून दिली आहे. स्पर्धेचे समन्वयक प्रा. अश्विनी परब यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे नियम समजावून सांगितले.
केदार गोडसे व तन्वी यानी सूत्रसंचालन केले. महाविद्यालयाच्या म्यूट कोर्ट समिती अध्यक्ष प्रा. अश्विनी परब, विद्यार्थी सचिव श्रुती कोलकी व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments