Banglore

मुस्लिम कधीही देशाच्या बाजूने असू शकत नाहीत : यत्नाळ

Share

मुस्लिम कधीच देशाच्या बाजूने असू शकत नाहीत. ते कायमच धर्माच्या बाजूने राहतात, असे बेधडक विधान भाजप आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी आज विधानसभेत केले.

राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे उमेदवार नासिर हुसेन यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सवादरम्यान पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या प्रकरणावरून बुधवारी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. यावेळी आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ म्हणाले की, पाकिस्तान समर्थक घोषणा देणारे कोण होते? सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांचा निषेध केला.

काँग्रेस सदस्यांच्या आक्षेपाला न जुमानता आपल्या या शब्दाचा बचाव करणारे बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी आपल्या वाक्याचा पुनरुच्चार केला की होय, या देशाचे अन्न खाणारे आणि येथे गद्दारी करणारे खरेच देशद्रोही आहेत. तत्पूर्वी बोलताना आमदार सुनीलकुमार कारकल म्हणाले की, धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली आहे. काही आमदार घटना घडलीच नसल्याचा दावा करत आहेत, तर काहींनी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. अप्रत्यक्षपणे काँग्रेस आमदारांमध्ये संभ्रम असून ते आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

माजी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे गंभीर प्रकरण आहे. याआधीही मंगळुरू येथे कुक्कर बॉम्बस्फोटातील आरोपी पकडले गेले तेव्हा काँग्रेसने अशीच वर्तणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.  बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी आंबेडकरांच्या पुस्तकातील ओळी उद्धृत करून मुस्लीम कधीच देशाच्या बाजूने राहू शकत नाहीत. ते धर्माच्या बाजूने आहेत. त्यामुळे धर्माच्या आधारावर देशाची फाळणी होत असेल तर मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवा आणि हिंदूंना भारतात बोलवा, असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते अशी आठवण करून दिली.
एकूणच आजचे अधिवेशन पूर्णपणे पाक समर्थक घोषणेवरून निर्माण झालेल्या वादाचे साक्षीदार ठरले.

Tags: