Belagavi

संतकवी सर्वज्ञांनी लिहिलेली त्रिपदी वचने सर्वकालीन श्रेष्ठ : प्राचार्या डॉ. निर्मला भटकळ

Share

संतकवी सर्वज्ञांनी लिहिलेली त्रिपदी वचने सर्वकालीन श्रेष्ठ आहेत, त्रिपदींच्या माध्यमातून त्यांनी समाजातील कुप्रथा दूर करण्यासाठी प्रयत्न केल्याचे प्रतिपादन प्राचार्या डॉ. निर्मला भटकळ यांनी केले.

बेळगाव येथील कुमार गंधर्व कला मंदिरात आज आयोजित जिल्हा प्रशासन आणि कन्नड आणि संस्कृती विभागाच्या वतीने आयोजित त्रिपदी सर्वज्ञ जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

त्यानंतर बोलताना प्राचार्या डॉ. निर्मला भटकळ म्हणाल्या की, सर्वज्ञ हे एका समाजापुरते मर्यादित राजू नयेत. ते आजवरचे सर्वकालीन कवी राहिले आहेत. त्यांच्या शब्दांना आणि विचारांना ओळखून सर्वांनी त्यांची जयंती साजरी करावी. 16 व्या शतकात त्यांनी आपल्या त्रिपदीच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, परंपरा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. एक हजाराहून अधिक त्रिपदी निर्माण करून त्यांनी समाज सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. असे प्राचार्या डॉ. निर्मला भटकळ यांनी सांगितले.

यावेळी कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, जिल्हा पंचायतीचे सहाय्यक सचिव राहुल कांबळे, डॉ. आय. एस. कुंभार, सुरेश वैद्य, चंद्रशेखर यडूर, निंगापा कुंभार, ज्योती बदामी, बेळगावचे तहसीलदार सिद्दू भोसगी उपस्थित होते.

Tags: