Belagavi

नेगीलयोगी रयत संघटनेच्या वतीने आंदोलन

Share

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याचा आग्रह धरत नेगीलयोगी रयत संघटनांचे वतीने बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो आंदोलक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

जिल्हयातील शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी व समस्यांबाबत शासन, लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या दुर्लक्ष व दिरंगाई वृत्तीच्या विरोधात व विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नेगीलयोगी रयत संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून शासनाचा निषेध केला.

खानापूर हा बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून येथे सुमारे 210 गावे आणि 51 ग्रामपंचायती आहेत. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेला लागून असलेला हा तालुका राज्यात सरकार असतानाही दुर्लक्षित आहे. या तालुक्यातील गावे आजवर अनेक ज्वलंत समस्यांनी ग्रासली आहेत, दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नेगीलयोगी रयत संघाचे अध्यक्ष रवी पाटील म्हणाले की, मान्सूनच्या हंगामातील भीषण दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे पिकांविना आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांनी विविध बँकांमध्ये घेतलेले कृषी कर्ज माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली.
नेगीलयोगी रयत संघाच्या सदस्यांसह शेकडो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: