Belagavi

बेळगावात सामाजिक कार्यकर्त्यांकडून वारकऱ्यांचे स्वागत

Share

खानापूर तालुक्यातील गोळ्याळी गावातील वारकऱ्यांचे सामाजिक कार्यकर्त्यांनी बेळगावात शीतपेये आणि बिस्किटे देऊन स्वागत केले.

गोळ्याळी गावातील वारकऱ्यांची दिंडी पायी चालत पंढरपूरकडे निघाली आहे. आज शनिवारी सकाळी वारकरी पायी चालत बेळगावात वैभव नगर येथे आल्यावर सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले व अभिजित बेकवाडकर यांनी त्या वारकऱ्यांना रिलायन्स फ्रेश येथे त्या सर्व वारकऱ्यांना कोल्ड ड्रिंक्स, पाण्याच्या बाटल्या दिल्या. तसेच रिलायन्स फ्रेश स्टोअरतर्फे बिस्किटे देण्यात आले. खरेदीसाठी आलेल्या डॉक्टर मनोज एम एल व ग्राहकांनी सुद्धा पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांचेही वाटप केले.

सर्व वारकऱ्यांनी प्रसाद चौगुले यांच आभार मानले.  समाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले व अभिजित बेकवाडकर यांनी वारकऱ्यांना देवाकडे एक मागणी करा राज्याला दुष्काळ मुक्त कर आणि चांगला पाऊस पडू दे, अशी प्रार्थना करण्यास सांगितले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद, अभिजीत बेकवाडकर, स्टोअर मॅनेजर रमेश पाटील, नागरिक व वारकरी मंडळी उपस्थित होती.

Tags: