मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज दुसरा राज्यस्तरीय जनस्पंदन कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या लोकांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांना आपल्या तक्रारी सादर केल्या.
पहाटेपासूनच नागरिकांनी विधानसौधसमोर मोठ्या संख्येने गर्दी करून आपल्या तक्रारी मांडल्या. या सार्वजनिक मेळाव्यासाठी तरुणांसोबतच वृद्ध, दिव्यांगही दाखल झाले होते.

अपेक्षेपेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्याने आणखी एक काउंटर उघडण्यात आला. जनस्पंदन कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी मॅजेस्टिक ते विधानसौधपर्यंत मोफत बस व्यवस्था करण्यात आली होती. हा जनस्पंदन कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होऊन सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालला. तक्रारदार लोकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी 36 काउंटर उभारण्यात आले होते. सर्व काउंटर तक्रारअर्ज देण्यासाठी तोबा गर्दी झाली होती.


Recent Comments