Banglore

10 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर : विजयेंद्र

Share

राज्यातील कोणत्या मतदारसंघातून कोणी निवडणूक लढवायची याचा निर्णय आमच्या पक्षाचे नेते घेतील. 28 मतदारसंघात उमेदवार कोण असतील याचा निर्णय भाजप नेते घेतील, असे महत्त्वपूर्ण विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी केले आहे.

बेंगळूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बी वाय विजयेंद्र म्हणाले की, कार्यकर्त्यांच्या मतानुसार योग्य उमेदवाराची घोषणा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 10 तारखेला बंगळुरूला येणार आहेत. येथील बैठकीत लोकसभा मतदारसंघातील एक समूह सहभागी होणार आहे. त्यानंतर ते कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करतील. त्यांचा एक सरकारी कार्यक्रमही असल्याचे आपण ऐकले आहे, असे ते म्हणाले.

राज्यातील काँग्रेस सरकारच्या वृत्तीमुळे जनताच नाही तर गुरेढोरेही या सरकारला शिव्याशाप देत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचाच नव्हे, तर गोरगरिबांचा रोष राज्य सरकारवरही ओढवला आहे, असे ते म्हणाले.  येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना दूध उत्पादकांना प्रोत्साहन देत असत. त्यामुळे भाजपच्या राजवटीत 26 लाख ग्रामीण शेतकऱ्यांकडून दररोज 80 ते 85 लाख लिटर दूध संकलन व्हायचे. सध्याच्या काँग्रेस सरकारने दूध उत्पादकांसाठी 716 कोटी रुपयांचे प्रोत्साहन थकीत ठेवल्याची टीका त्यांनी केली. याचा परिणाम म्हणून दुधाचा साठा १० लाख लिटरने घटला आहे, असे ते म्हणाले.

Tags: