Banglore

गोडसेचे अनुयायी करताहेत समाजातील शांतता भंग : मुख्यमंत्री सिद्दरामय्या

Share

सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकोप्याने राहावे, असे स्वप्न पाहणाऱ्या महात्मा गांधींनी सर्वांना समान मानले आणि सर्वांना न्याय दिला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशाला स्वातंत्र्य मिळाले, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

सिद्धरामय्या यांनी आज विधानसौध आणि विकाससौध दरम्यान असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शहीद झालेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शहीद दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.  त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, 30 जानेवारी 1948 रोजी गोडसेने गोळ्या झाडून महात्मा गांधींना शहीद केले होते. वल्लभबाई पटेल यांच्याशी संवाद साधल्यानंतर गांधीजींना भजनासाठी निघायला थोडा उशीर झाला. तेव्हा मारेकरी गोडसेने गांधीजींच्या चरणी नतमस्तक होण्याच्या बहाण्याने त्यांची हत्या केली. गांधीजींच्याच नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळाले. ते म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बलिदान दिले आहे.

गांधींनी शांततेचा संदेश दिला. परंतु, गोडसेचे अनुयायी समाजातील शांतता भंग करत असल्याच्या घटना अलिकडे घडत आहेत का, या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. आपण परस्पर प्रेम, विश्वास आणि शांतता असलेल्या समाजात राहायला हवे. माणसा-माणसात तेढ वाढवणारे काम करू नये, असे ते म्हणाले.

 

Tags: