Belagavi

प्रभू रामचंद्रांच्या वनगमन पथाचा अभ्यास करण्यासाठी राम उत्सव यात्रा

Share

प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना देशभरातील अनेक ठिकाणांना भेट दिली होती. वाल्मिकी रामायणानुसार त्यापैकी ७२ प्रमुख स्थळांना भेटी देऊन त्यांचे धार्मिक पर्यटन स्थळांत परिवर्तन करणे, त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल याचा अभ्यास करण्यासाठी ‘रामेश्वरम ते अयोध्या’ अशी राम उत्सव यात्रा काढण्यात येत आहे.

श्रीरामांनी भेट दिलेल्या ७२ प्रमुख स्थळांना भेटी देऊन त्यांचे धार्मिक पर्यटन स्थळांत परिवर्तन करणे, त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल याचा अभ्यास करण्यासाठी ‘रामेश्वरम ते अयोध्या’ अशी राम उत्सव यात्रा काढण्यात येत आहे, अशी माहिती यात्रा उत्सव समितीचे प्रमुख मलय दीक्षित आणि अपूर्वा सिंग यांनी आज बेळगावात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना मलय दीक्षित म्हणाले की, देशभरातील सुमारे दीडशे युवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या सहभागाने ही अनोखी यात्रा काढण्यात येत आहे. १४ जानेवारीला इंदूर येथून सुरु झालेली ही यात्रा १४ फेब्रुवारीला मकरसंक्रांत वसंत पंचमी तिथीला अयोध्या येथे पोहोचणार आहे. यात्रेदरम्यान

वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामांनी भेट दिलेल्या ७२ प्रमुख पण सध्या दुर्लक्षित असलेल्या स्थळांना भेटी देऊन त्यांचे धार्मिक पर्यटन स्थळांत परिवर्तन करणे, त्यातून रोजगार निर्मिती कशी होईल याचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी गेल्या ३०-३५ वर्षांपासून श्रीराम, त्यांचे जीवनचरित्र आणि विविध भाषांतील रामायणाचा अभ्यास करणाऱ्या रामअवतार शर्मा व अन्य तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील शबरी कोळ्ळ येथे श्रीराम आणि शबरीची भेट झाल्याची लोकांची धारणा आहे. आजही तेथे पाण्याचे शबरीकुंड, बोराचे झाड, शबरी आश्रम आणि श्रीरामांनी स्वतः स्थापन केलेले शिवलिंग आहे. हे स्थान दुर्लक्षित आहे. त्याचा विकास केल्यास धार्मिक पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होऊ शकते. श्रीरामांच्या वनवास काळातील खडतर जीवनचर्येचा देशातील युवकांना परिचय करून देणे, त्यांचा आदर्श युवकांसमोर ठेवणे हासुद्धा या यात्रेचा एक हेतू आहे. त्यासाठी दीडशे युवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सची मदत घेण्यात येत आहे. यात्रा पूर्ण झाल्यावर हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आपापल्या सोशल मीडिया व्यासपीठावर आपापल्या पद्धतीने यात्रेचा प्रवास मांडणार आहेत. यात्रेदरम्यान केलेल्या अभ्यासावर आधारित अहवाल पर्यटन मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे. श्रीरामांनी भेट दिलेल्या स्थानांचा धार्मिक पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करून रोजगाराला चालना देणे हा यामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रा समितीच्या पदाधिकारी अपूर्वा सिंह यांनी सांगितले की, वाल्मिकी रामायणात श्रीरामांनी भेट दिलेल्या ठिकाणच्या मातीचा जसा उल्लेख आहे, तशीच माती आजही त्याठिकाणी उपलब्ध आहे. त्यामुळे या यात्रेत आम्ही भेट दिलेल्या ठिकाणची माती गोळा करून अयोध्येत त्या एकत्रित मातीत ‘रामायण’ नावाचे झाड आम्ही लावणार आहोत

राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले की, श्रीरामाचा आणि कर्नाटकाचा अन्योन्य संबंध आहे. कर्नाटकातील श्रीरंगपट्टणम, हासन जिल्ह्यातील रामनाथपुरम, बळ्ळारी जिल्ह्यातील हंपी, कोप्पळ जिल्ह्यातील किष्किंधा आणि बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील शबरीकोळ्ळ आदी ठिकाणी श्रीरामांनी भेट दिल्याचे मानले जाते. या ठिकाणांनाही राम यात्रा उत्सव समितीचे सदस्य भेट देऊन भ्यास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला खासदार मंगल अंगडी, भाजप राज्य उपाध्यक्ष माजी आमदार अनिल बेनके, जिल्हाध्यक्षा गीता सुतार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते.

Tags: