सरकार घटनेनुसार चालत असेल तर उपमुख्यमंत्र्यांची पदे रद्द करा आणि जर परंपरेप्रमाणे चालत असेल तर बेळगावातील सुवर्णसौध येथे 1 मुख्यमंत्री आणि 4 उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केली.
कर्नाटकात सध्या डिके शिवकुमार उपमुख्यमंत्री असताना आणखी तीन उपमुख्यमंत्री नेमण्याच्या हालचाली सुरु आहेत. या संदर्भात बेळगावात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना भीमाप्पा गडाद म्हणाले की, घटनेच्या कलम 163, 164 मध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीची तरतूद नाही, उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती ही परंपरेनुसारच होत आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आमच्या सरकारचा कारभार परंपरेनुसार चालतो, संविधानानुसार नाही.
तसे असेल तर आनंदच आहे, उत्तर कर्नाटकसाठी सुवर्णसौधमध्ये 1 मुख्यमंत्री आणि 4 उपमुख्यमंत्री नियुक्त करा, 500 कोटी रुपये खर्च करून सुवर्णसौध बांधली आहे. त्यांना तिथे बसून काम करण्यास कोणतीही अडचण नाही. प्रशासन चालवणे सोयीचे होईल. त्यामुळे उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटक हा भेदभाव तर कमी होईल. स्वतंत्र राज्याची मागणीही कमी होईल. 800 किमीचा प्रवास करून बेंगळूरला जाऊन 10 हजार रुपये खर्च करणे टळेल, असे ते म्हणाले.


Recent Comments