लोकसभा निवडणुकीपूर्वी आम्ही दिलेल्या सर्व पाच आश्वासनांची पूर्तता केली आहे. यावेळी लोकसभेला कर्नाटकातून काँग्रेसचे जास्त उमेदवार विजयी होतील, असा आशावाद माजी मंत्री एच. एम. रेवण्णा यांनी व्यक्त केला.
हमी योजनेवर टीका करणाऱ्या भाजपला आता ‘मोदी हमी’ला चिकटून बसण्याची परिस्थिती आली आहे. देशात सध्या परिवर्तन होत आहे. भाजपशासित राज्यात हमी योजना राबवल्या जात आहेत, यावरून त्यांचा ढोंगीपणा दिसून येतो. यावेळी “इंडिया” आघाडीचा आम्हाला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
कन्याकुमारी ते जम्मू काश्मीरपर्यंत राहुल गांधींची भारत जोडो यात्रा यशस्वीपणे लोकांच्या मनाला भिडली आहे. भाजपवाले दहा खोटे बोलून लोकांना खरे भासवितात. आता लोक राहुल गांधींना स्वीकारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मणिपूर ते मुंबई अशी न्याय यात्रा सुरू करण्यात आली आहे. ती यशस्वी होईल असे ते म्हणाले.
भाजपच्या जनविरोधी, कुशासन आणि भ्रष्टाचाराविरोधात राज्यातील जनतेने काँग्रेसला अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे, हे समाधानकारक आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या संयुक्त दृष्टिकोनातून राज्य सुरळीत चालू आहे. यापूर्वी 2013 मध्ये, सिद्धरामय्या यांनी पाच वर्षांच्या कालावधीत दिलेली 165 आश्वासने पूर्ण केली, हा विक्रम करणारे ते भारतातील पहिले मुख्यमंत्री होते. तसेच कोविड काळात काँग्रेस पक्षाचे पदेशाध्यक्ष पद स्वीकारलेले डीके शिवकुमार यांनी, कौशल्याने संघटनेवर अधिक भर दिल्याने राज्यात काँग्रेसचे सरकार निवडून आले आहे.
भाजप, आरएसएस सुसंस्कृत असल्याचा लोकांचा आधी गैरसमज होता. खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या मुखातून भूताच्या तोंडातून भगवद्गीता येत आहे. पूर्वी भाजपमध्ये पाच-सहा लोक ढोंगी होते. सीटी रवीसह काही लोक आता घरात बसले आहेत. राज्यात कोविड महामारी मुस्लिम समुदायामुळे आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते घटनात्मक राज्य करत नाहीत. ते केवळ जातीय दंगली घडवून राज्य करतात. भाजपच अनंतकुमार हेगडे यांच्या विधानाचे खुद्द भाजप नेतेच समर्थन देत नाहीत. त्यांनी बोलतांना जरा जपून बोलले पाहिजे, असे पत्रकाराच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.


Recent Comments