सवर्ण समाज आज शोषित, अत्याचारितांचा आवाज दडपण्याचे काम करत आहे. त्यासाठी दलित, मागास, आदिवासी, भटके, अल्पसंख्याकांनी आपल्या हक्कासाठी ताकद दाखवावी लागेल, असा इशारा कर्नाटक शोषित समाज महासंघाचे अध्यक्ष के.एम. रामचंद्रप्पा यांनी दिला.
बेळगावातील कुमार गंधर्व रंगमंदिरात कर्नाटक शोषित समाज महासंघ आणि कर्नाटक राज्य मागास जाती संघाच्या प्राथमिक बैठकीत बोलताना के.एम. रामचंद्रप्पा यांनी 28 रोजी चित्रदुर्ग येथे होणाऱ्या राज्य शोषित जागृती परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले की, 1931 मध्ये जातनिहाय सर्वेक्षण झाले. 92 वर्षांनंतर आता पुन्हा जातनिहाय जनगणना होणार आहे. लिंगायत आणि वक्कलिग हे मागासलेले नाहीत. कारण नागनगौडा आयोगाच्या अहवालात त्यांनी याला विरोध दर्शविला होता. हावनूर यांनी आयोगाचा अहवाल फेटाळला होता. मात्र मागासवर्गीयांचे तत्कालीन मुख्यमंत्री डी. देवराज आरस यांनी धाडसाने अहवालाची अंमलबजावणी केली. गप्प राहिल्यास अत्याचारग्रस्त समाजाला त्रास होईल, असा इशारा त्यांनी दिला.
शोषित समाजाच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. सिद्धरामय्या यांच्या टीमचे सुजाण राजकारणी असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी कोणतीही प्रसिद्धी न घेता ते आमच्यासाठी काम करत आहेत. त्यांना तमाम शोषितांनी आपला नेता म्हणून स्वीकारले आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी मानव बंधुत्व वेदिकेचे माजी राज्य समन्वयक रवींद्र नाईकर, मानव बंधुत्व वेदिकेचे विभागीय समन्वयक तोळी भरमन्ना, एनगेरे वेंकटरामय्या, आदर्श यल्लाप्पा, एम. इरण्णा, बसवराज बसवळीगुंडी, मल्लेश चौगले, बी. सुब्रमण्य, रामचंद्रप्पा, बंगळुरूचे माजी नगरसेवक जी. कृष्णमूर्ती, एम. कृष्णमूर्ती, मडेप्पा तोळीनावर, सिद्धार्थ सिंघे, करेप्पा गुडेन्नावर, रुद्रप्पा संगप्पगोळ, विठ्ठल पोळ, अमृत दब्बीन्नावर, शंकर बिळकुंबी, भरमण्णा उप्पार, युवराज तळवार यांच्यासह शोषित समाजाचे अनेक नेते सहभागी झाले होते.


Recent Comments