Banglore

भाजपने प्रभू रामचंद्र यांना राजकीय मुद्दा बनवले : सिद्धरामय्या

Share

येत्या 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी धर्मादाय खात्याच्या अखत्यारीतील सर्व मंदिरात पूजा करण्याचा आदेशाबाबत माहिती नाही, असे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी स्पष्ट केले.

राममंदिराच्या उद्घाटन समारंभात भाग न घेण्याचा निर्णय काँग्रेसने घेतल्याबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आम्ही राम मंदिराच्या विरोधात नाही, तर आम्ही भाजपच्या राजकारणाच्या विरोधात आहोत. श्री रामचंद्र यांना भाजपने राजकीय मुद्दा बनवले आहे. यालाच आमचा विरोध आहे. आपण सर्व श्रीरामचंद्रांचे भक्त आहोत. केंद्रीय मंत्री राजकारणावर बोलत आहेत आम्ही श्री रामचंद्रांचा आदर करतो, पूजा करतो, भजन करतो.

22 तारखेला धर्मादाय खात्याच्या सर्व मंदिरात पूजाअर्चा करण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाला प्रतिक्रिया देताना, धर्मादाय खात्याच्या आदेशाची मला माहिती नाही. मी तो आदेश दिलेला नाही, असे ते म्हणाले. राम मंदिराच्या उद्घाटनाला काँग्रेस जात नाही हे दुर्दैवी आहे या माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या विधानावर बोलताना येडियुरप्पा आताच का अयोध्येला जात आहेत? श्री रामचंद्र इथे नाहीत का? येथेही त्यांची पूजा करता येत नाही का? असा सवाल त्यांनी केला.

Tags: