Belagavi

कडोलीत ३९ वे मराठी साहित्य संमेलन :साहित्यिक कवींची मांदियाळी

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावात आज साहित्याचा जागर झाला . स्वामी विवेकानंद नगरीत कडोलीचे ३९ वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले .

कडोलीतील ३९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथदिंडी काढण्यात आली . अनुसया मेनन यांनी ग्रंथदिंडीचे पूजन केले . यानंतर उपस्थित साहित्यिक आणि मान्यवरांच्या सहभागाने कडोली गावातील प्रमुख मार्गांवरून ग्रंथदिंडी काढण्यात आली . श्री कलमेश्वर आणि वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळ , झान्ज तसेच ढोलताशा पथक , मराठी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे लेझीम व लाठी पथक तसेच , डोक्यावर जलकुंभ घेऊन सजलेल्या मुली , विविध वेशभूषा केलेली मुलीने , सजवलेल्या बैलगाड्या आदींसह ही ग्रंथदिंडी गावातील मुख्य मार्गावरून संमेलन स्थळी नेण्यात आली .

संमेलनाच्या पहिल्या सत्रात , संमेलनाध्यक्ष प्रा . दिनेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले . ज्ञान आणि ज्ञानी यांची सांगड राज्यकर्ते घालत नाही , राज्यकर्त्यांना , सत्ताधाऱ्यांना ज्ञानी माणसांचा ओढा असतो परंतु त्यांना ज्ञान चालत आंही गाव तेथे ग्रंथालय हे सयाजीरावाणी त्या काली सुरु केले होते . महिलांना बाळासाहेब फाळके याना पहिला कॅमेरा घेऊन देणारे सयाजीरावच होते . त्यानंतर त्यांनी पहिला चित्रपट तयार केला . सयाजी रावांचे फोटो प्रत्येक मराठी साहित्य संमेलनात लावला पाहिजे .

कडोली साहित्य संमेलनाचे प्रास्ताविक अरुण पाटील यांनी केले . साहित्य हे मानवी जविणाचा आरसा आहे असे म्हटले जाते त्यामध्ये जीवनाचे ब्रीद दडले आहे . मानव समूहाला समृद्ध करण्याचे काम साहित्याने केले आहे . रामायण , महाभारत यासारखा गंथातून आपल्याला याची प्रचिती येते . दुसऱ्या सत्रात संदीप कदम यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यान पार पडले . तिसऱ्या सत्रात नवोदितांचे कथाकथन, तर चौथ्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले .

या संमेलनात , शांत होनगेकर , गजानन सावंत , वदान्य चैतन्य दास , गजानन कविलकर , प्राजक्ता होनगेकर , शिवाजी कदम , डॉ . प्राजक्ता टुमरी , रवी होनगेकर , बसवंत शहापूरकर तसेच निमंत्रित पाहुणे , साहित्यप्रेमी , विद्याथी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

Tags: