राज्यातील काँग्रेस सरकारला ४८ तासांची मुदत देत आहोत, या दरम्यान श्रीकांत पुजारीला सोडले नाही तर भाजप युवा मोर्चा हुबळी पोलीस ठाण्याला घेराव घालेल. जोपर्यंत श्रीकांत पुजारीला न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी राज्य सरकारला दिला आहे.
राममंदिर संघर्षादरम्यान घडलेल्या प्रकरणाशी संबंधित करसेवक श्रीकांत पुजारी यांना हुबळी येथे आता अटक केल्याचा निषेध करत भाजपने बंगळुरूच्या फ्रिडम पार्कमध्ये जोरदार निदर्शने केली.
करसेवक श्रीकांत पुजारी यांच्या अटकेचा निषेध करत भाजपने शहरातील फ्रीडम पार्क येथे राज्य सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात सहभागी होताना विजयेंद्र म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण आहे. हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी शेकडो लोकांचा संघर्ष केला आहे. वर्षानुवर्षे हिंदूंच्या तपश्चर्येमुळे आता मोदींच्या नेतृत्वाखाली राम मंदिराचे उदघाटन होत आहे. एकीकडे रामभक्त पवित्र मंत्राक्षतांचे वाटप करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदुद्रोही, रामविरोधी काँग्रेस सरकार मंत्राक्षतांचे वाटप रोखत आहे, असा आरोप त्यांनी केला.
माजी मंत्री बेजबाबदार विधान करत आहेत. माजी मंत्री अंजनेयांचे विधान बघितले तर देव त्यांना वाचवो. दरम्यान, या सरकारने करसेवक श्रीकांत पुजारीला अटक करण्याचा घाट घातला आहे. द्वेषाचे आणि हिंदूंना पायदळी तुडवण्याचे राजकारण करत आहे. त्यांना योग्य धडा शिकवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
पूर्वी, सिद्धरामय्या सरकारने पीएफआय कार्यकर्त्यांवरील खटले मागे घेतले. डीजे हळ्ळी, केजे हळ्ळी गावातील दंगलीचा खटला मागे घेतला आहे. कन्नड समर्थक आणि शेतकर्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हे बघून आम्ही शांत बसू शकत नाही, आम्हाला योग्य ते उत्तर द्यावे लागेल. आज आम्ही राज्य सरकारला ४८ तासांची मुदत देत आहोत. दरम्यान, श्रीकांत पुजारीची सुटका न झाल्यास युवा मोर्चा हुबळी पोलिस स्टेशनला घेराव घालेल, असा इशारा त्यांनी दिला.
आज आणि उद्या भाजप राज्यात आंदोलन करणार आहे. तुमचा दृष्टीकोन बदला. भाजप मागे हटणार नाही आणि हिंदू कार्यकर्त्यांना घाबरवताना पाहणार नाही, ते रस्त्यावर उतरून लढतील. हा मुघल दरबार नाही, तालिबान सरकार नाही. फक्त भाजपच नाही, तर सर्व स्वाभिमानी कन्नडिग लढतील. जोपर्यंत श्रीकांत पुजारीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही, असे ते म्हणाले.


Recent Comments