समाजात अशांतता निर्माण करून राज्याची आणि देशाची बदनामी करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
हुबळी येथील राम मंदिर कार्यकर्त्याच्या अटकेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना डीके शिवकुमार म्हणाले की जुनी प्रकरणे पुन्हा उघडण्यामागे कोणतेही राजकारण नाही. एक तर भाजपला विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी सहा महिने लागले. आता काहीही न करता ते आरोप करत आहेत. आम्ही आमचे काम सुरूच ठेवू,” असे डीकेशी म्हणाले.
हुबळी, बेंगळुर येथे अनेक निरपराध लोकांवर गुन्हे दाखल करणारा भाजप आज हुबळी येथे आंदोलन करत असल्याची टीका करताना शिवकुमार यांनी त्यांचे सरकार असताना त्यांनी काय केले होते असा सवाल केला.


Recent Comments