रिंगरोडबाबत सर्वे करून त्यातील झाडांची माहिती घेण्यासाठी आलेल्या महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना जागरूक शेतकऱ्यांनी परत धाडल्याची घटना आज बेळगाव तालुक्यातील झाडशहापूरजवळ घडली.
बेळगाव-मच्छे रिंगरोड बायपासला शेतकऱ्यांचा अनेक वर्षांपासून प्रखर विरोध सुरु आहे. तरीही अधूनमधून महामार्ग प्राधिकरणाकडून या रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली आहे. प्रकरण न्यायालयात असतानादेखील आज झाडशहापूरजवळ रिंगरोडबाबत सर्वे करून त्यातील झाडांची माहिती घेण्यासाठी अधिकारी आले असता जागरुक शेतकऱ्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना परत धाडले.
भरमा नंदीहळ्ळी व अन्य शेतकऱ्यानी पोलिस संरक्षणात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना हायकोर्टाचा स्टे दाखवताच त्यांनी माघार घेतली.


Recent Comments