काँग्रेस हा देशातील जनतेच्या कल्याणासाठी उदयास आलेला पक्ष आहे. पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. काँग्रेस पक्षामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, अन्य कोणत्याही पक्षामुळे नव्हे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठणकावून सांगितले.
बेंगळूरमधील केपीसीसी कार्यालयाच्या भारत जोडो हॉलमध्ये गुरुवारी आयोजित काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिन सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, ‘भाजप, जनसंघ, आरएसएस परिवारातील एकाही व्यक्तीने ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला नाही. आरएसएसचा जन्म ब्रिटिश राजवटीत झाला. मात्र, इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात त्यांनी एक दिवसही भाग घेतला नाही. लोकांना भाजपचा खोटेपणा पटवून द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
नेहरू- इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आधुनिक भारताचे निर्माते होते. राजीव गांधी यांनी देशात इंटरनेटच्या व्यापक प्रसाराचा पाया घातला. भाजपने अपप्रचार करण्यापेक्षा वेगळे काय केले आहे? असा सवाल त्यांनी केला.


Recent Comments