सिद्धरामय्या सत्तेत आल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला काही वेगळ्या अपेक्षा नव्हत्या. काँग्रेस आता मुस्लिमांचा पक्ष बनला आहे, अशी टीका विचारवंत चक्रवर्ती सुलिबेले यांनी केली आहे.
राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब घालण्यास पुन्हा परवानगी दिली जाईल, या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानामुळे आता राज्यभर वादंग पेटले आहे. यावर भाष्य करणाऱ्या विचारवंत चक्रवर्ती सुलिबेले यांनी, सिद्धरामय्या सत्तेवर आल्यानंतर त्यांच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा नव्हत्या. मुख्यमंत्र्यांचा कायद्यावर विश्वास नाही. कायदा जे सांगतो ते मान्य करण्याची मानसिकता नाही. मुस्लीम मते कशी तरी आकर्षित करायची ही त्यांची रणनीती आहे. त्यामुळे काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष झाला आहे, असे ते म्हणाले.
शिक्षण धोरणात समानता यावी यासाठी भाजप सरकारच्या काळात ड्रेस कोड लागू करण्यात आला होता. पीएफआयने हिजाबचा पुरस्कार केला होता. यापूर्वी सिद्धरामय्या यांनी पीएफआयचे समर्थन करत त्यांच्या विरोधातील खटले निकाली काढले होते. आता सत्तेत आल्यानंतर त्यांनी हिजाबवरील बंदी उठवणार असल्याचे म्हटले आहे, ही अत्यंत दु:खद बाब असल्याचा संताप सुलिबेले यांनी व्यक्त केला.


Recent Comments