राज्यातील 450 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरही राज्य सरकार डोळे आणि कान नसल्याप्रमाणे वागत असल्याचा संताप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी व्यक्त केला.
हिवाळी अधिवेशनात आज विधानसभेत बोलताना बी. वाय. विजयेंद्र म्हणाले की, उत्तर कर्नाटकचे प्रवेशद्वार असलेल्या बेळगावात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, राज्य सरकार सत्तेत येऊन 6 महिने लोटले तरी राज्यातील दुष्काळाचा प्रश्न सुटलेला नाही. राज्यात तब्बल 450 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, पण सरकार त्यांच्या मदतीला धावून गेले नाही. शेतकर्यांना कर्जमाफी किंवा दुष्काळी मदत जाहीर करण्याची अपेक्षा होती पण त्यांनी ते केले नाही.
राज्यातील धान, मका आणि आणि अन्य पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. पाण्याच्या समस्येने शेतकरी त्रस्त आहेत, राज्यातील 450 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तरीही राज्य सरकार डोळे आणि कान नसल्याप्रमाणे वागत आहे, असा आरोप विजयेंद्र यांनी केला. फ्लो
यावेळी बोलताना डी.के.शिवकुमार म्हणाले की, राज्य सरकारला डोळे नाहीत, कान नाहीत, हृदय नाही असा आरोप तुम्ही करताय, तो खरा नाही.
राज्यात विजेअभावी शेतकऱ्यांची समस्या सोडवता येत नाही, असे ऊर्जामंत्री के.जे.जॉर्ज यांनी सांगितले. राज्याला 14 हजार मेगावॅट विजेची गरज आहे, मात्र सरकार 10 हजार मेगावॅट विजेची भर घालत आहे, राज्य सरकारकडे अतिरिक्त वीज उपलब्ध नाही, असे त्यांनी सांगितले. फ्लो


Recent Comments