राज्यात बहुमताचे सरकार अस्तित्वात आले आहे. विरोधी पक्ष असो वा कोणीही, आम्ही सरकार पाडू असे म्हणणे लोकशाही व्यवस्थेत चांगली गोष्ट नव्हे असे कायदा व संसदीय व्यवहार मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले.
बेळगावात सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री एच. के. पाटील म्हणाले की, कुमारस्वामी राज्याचे मुख्यमंत्री होते. सध्या अधिवेशन सुरू आहे. अशा वेळी राज्य सरकार पडेल, असे सांगून ते सरकारला हादरे देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही खंबीर आहोत, सरकार पडणार नाही.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे सरकार पडणार नाही. 17 जणांना मुंबईत नेऊन सरकार पाडणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला आहे. सरकार पाडू असे म्हणणे लोकशाहीत चांगली घडामोड नाही, असे मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले.


Recent Comments