बेळगाव जिल्हा लेखिका संघ आणि लोकविद्या प्रकाशन, संकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने कन्नड साहित्य भवनात जयश्री आणि जयप्रकाश अब्बीगेरी या दाम्पत्याने लिहिलेल्या 15 पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रा. बी. एस. गवीमठ यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
पुस्तकांचे प्रकाशन करून बोलताना प्रा. बी. एस. गवीमठ म्हणाले की, अशा अनेक साहित्यिक कार्यक्रमात मी जवळपास 50 वर्षांपासून सहभागी आहे. अनेक नामवंत लेखकही यथावकाश साहित्य लिहितात. आमचे मित्र पाटील 700 पानांच्या प्रचंड कादंबरीचे प्रकाशन करत आहेत. हा साहित्य विश्वातील हा एक मोठा विक्रम आहे. जयश्री अब्बीगेरी आणि जयप्रकाश अब्बीगेरी यांच्या 15 कृती आज प्रकाशित झाल्या आहेत. त्याचे प्रकाशन करणे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
जयश्री आणि जयप्रकाश लिखित, ‘स्वत:ला एक यशस्वी व्यक्ती समजा’, श्रीमतींची श्रुंगसभा, जीवनदी, बानुली नगे, वचन वाहिनी आदी 15 कृती प्रकाशित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
अध्यक्षस्थानी जिल्हा लेखिका संघ बेळगावच्या अध्यक्षा जयशीला ब्याकोड होत्या. निवृत्त प्राचार्य बी. एस. गवीमठ यांनी पुस्तकांचे प्रकाशन केले.

या प्रसंगी निवृत्त प्राध्यापक डॉ. पी.जी. केम्पण्णावर, सेवानिवृत्त प्रा. गुरुदेवी हुलेप्पनवरमठ साहित्यिक सुनंदा एम्मी, शिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. निर्मला बट्टल, कवयित्री आशा यमकनमर्डी यांच्यासह साहित्य रसिक उपस्थित होते.


Recent Comments