Belagavi

राज्यात ‘पे सीएम, पे डीसीएम’ सरकार : यत्नाळ

Share

ठेकेदारांची अडचण दूर करण्यासाठी शासन कार्यवाही करत नाही. राज्यातील कंत्राटदारांना पैसे देण्याऐवजी अन्य राज्यातील कंत्राटदारांना जास्त पैसे दिले जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केला.

सभागृहात शून्य तासात बोलताना यत्नाळ म्हणाले की, ठेकेदारांना पैसे न दिल्याने राज्यात विकास कामे रखडली आहेत. आमचे सरकार पेटीएम सरकार आहे, असे ते म्हणायचे. हे पे डीसीएम सरकार आहे. या सरकारमध्ये पे सीएम, पे डीसीएम असा मोठा घोटाळा झाला आहे. सरकारचे कमिशन ८० टक्क्यांवर आले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान यत्नाळ यांच्या आरोपाला सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवला. काँग्रेस सदस्यांनी राजकीय द्वेषातून आरोप करत असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले.

Tags: