बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो, यत्नाळ यांच्यामुळे भाजपचा सत्यानाश होईल, असा टोला आ. पुट्टरंगा शेट्टी यांनी लगावला.
सुवर्णसौधमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. पुट्टरंगा शेट्टी यांनी सांगितले की, यत्नाळ यांनी मुस्लिम समाजाबाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी मुस्लिमांकडे तुच्छतेने बघून त्यांच्या विरोधात वक्तव्य केले, त्यामुळेच त्यांनी निवडणूक जिंकली.
यत्नाळ जणू मी फार मोठा नेता आहे अशा थाटात बोलतात. ते स्वपक्षींयांविरोधातही बिनबुडाची विधाने करतात. त्यांचा पक्षाचे हायकमांडसुद्धा त्यांची विधाने स्वीकारायला तयार नाहीत. असे नेते भाजपमध्ये राहिल्यास भाजपचा नायनाट होईल, असा संताप त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments