काँग्रेस सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील, शेतकऱ्यांचा कर्दनकाळ ठरलेले सरकार असल्याची बोचरी टीका सभागृहात विरोधी पक्षाचे नेते आर. अशोक यांनी केली.
संपूर्ण कर्नाटक राज्यावर भीषण दुष्काळाची छाया पसरली आहे. खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम वाया गेले आहेत. शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी डोळे झाकून बसले आहे. सरकार केवळ मगरीचे अश्रू ढाळत आहे. राज्यात जुलै महिन्यापासून दुष्काळ पडला आहे. सप्टेंबरमध्ये दुष्काळ जाहीर करायला सरकारला तीन महिने लागले आहेत. तेरा तारखेला दुष्काळ जाहीर करूनही त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. सरकारने शेतकर्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायला हवं होतं. पण हे अत्यंत निष्ठुर सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. फ्लो
सरकारकडे पैसे नाहीत, म्हटले तर तेलंगणात जाहिरातबाजी करायला पैसे कुठून आले? मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला 2000 देणार असल्याचं सांगितलं. मी अधिका-यांना याबाबत विचारलं असता, ते म्हणाले की, ज्यांच्याकडे अर्धा एकर आहे, त्यांना 500 रुपये देणार आहेत, असे ते म्हणालेत. सरकार संकटग्रस्त शेतकऱ्यांना 2000 देऊ शकत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तेलंगणात प्रचार करायला सरकारकडे पैसे कुठून आले? हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.
काँग्रेसने राज्यात 50 वर्षे राज्य केले आहे, सिद्धरामय्या यांनी 14 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे, परंतु ते शेतकऱ्यांना रोजगाराच्या शोधात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाण्यापासून रोखू शकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
अशोक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ज्येष्ठ मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील जनता व शेतकऱ्यांना मदतीसाठी काँग्रेस सरकारने रोजगार हमी योजना अमलात आणली आहे, हे विसरून चालणार नाही. सगळे जग हे जाणते. फ्लो
त्यावर आर. अशोक म्हणाले की, एच.के.पाटील यांच्या रोजगार हमी योजनेत घोटाळे झाले असून 120 रुपयांत कोणी काम करणार नाही. त्यावर गरम झालेल्या प्रियांक खर्गे यांनी, केंद्रातील भाजप सरकार योजना रद्द करायला निघाले आहे ते पहा असे सुनावले. फ्लो
भाजपने दुष्काळाच्या अभ्यासासाठी 15 टीम तयार केल्या. सदानंद गौडा आणि येडियुरप्पानी राज्यभर फिरून दुष्काळाचा अभ्यास केला. सरकारला गांभीर्य असते तर दुष्काळाच्या अभ्यासासाठी अधिकारी नेमले असते, त्यांना कडक सूचना दिल्या असत्या. पण हे या सरकारने केलेले नाही असा आरोप अशोक यांनी केला.
राज्यात 15 महिन्यांचे लोडशेडिंग आहे, असे मी वर्तमानपत्रात वाचल्याचे अशोक यांनी सांगताच ऊर्जा मंत्री केजे जॉर्ज म्हणाले की, रेल्वे गाड्यांमधून जो कोळसा यायचा होता तो चोरीला गेला, त्यामुळे कोळशाचा तुटवडा आहे. त्यांच्या या उत्तरावर आर. अशोक पुन्हा गरम झाले. फ्लो


Recent Comments