बेळगावात भाजप नेते पृथ्वीसिंह यांच्यावर हल्ला झाल्याची घटना माझ्या निदर्शनात आली आहे. याबाबत पोलीस योग्य चौकशी करून अहवाल देतील, असे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सांगितले.
बेळगावात आज पत्रकारांशी संवाद साधताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर म्हणाले की, पृथ्वी सिंगची पार्श्वभूमी काय आहे आणि त्याच्यावर हल्ला का करण्यात आला? ते तपासातून कळायला हवे. या प्रकरणाची चौकशी करू. पोलिसांच्या अहवालानंतर पुढील निर्णयाची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर, ‘पोलिसांवर आमचा विश्वास नाही’, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष बी. विजयेंद्र यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री म्हणाले की, बोलणारे बोलत असतात. पण कोणावर तरी विश्वास ठेवलाच पाहिजे ना, ते पोलिसांवर विश्वास ठेवणार नसतील तर कोणावर विश्वास ठेवणार? जेव्हा त्यांना गरज असते तेव्हा त्यांचा पोलिसांवर विश्वास असतो, पण गरज नसते तेव्हा नाही. कायदा सर्वांना न्याय देण्याचे काम करत असून आपण त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, असे ते म्हणाले.


Recent Comments