बेळगावात आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकासह राज्यातील सर्व प्रश्नांवर चर्चा होणार आहे, त्यातही उत्तर कर्नाटकाच्या मुद्द्यावर अधिक चर्चा केली जाईल, असे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले.
बेळगाव विमानतळावर सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला बसलेल्या झटक्याच्या मुद्द्यावर उत्तर देताना भाजपकडे चांगली संसाधने आहेत, असे मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी सांगितले.
लोकांशी खोटं कसं बोलायचं हे भाजपने चांगलंच शिकून घेतलं आहे आणि लोकही त्यावर विश्वास ठेवतात.
तेलंगणात बीआरएसने आमच्यापेक्षा जास्त आश्वासने दिली. हमी दिली नसती तरी आम्ही जिंकलो असतो. केसीआर लोकांमध्ये नव्हते हेच त्यांच्या पराभवाचे कारण आहे, असे ते म्हणाले.
पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. असे ते म्हणाले. भवानी रेवण्णा यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर उत्तर देताना त्यांनी फक्त मी तो व्हिडिओ पाहिला नसल्याचे सांगितले आणि निघून गेले.


Recent Comments