राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिणचे भाजप आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहापूर येथील शिवाजी उद्यानाजवळ विजयोत्सव साजरा करण्यात आला.
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या जल्लोषात आमदार अभय पाटील यांनी ढोल वाजवून, भाजपचा झेंडा हातात घेऊन ‘हर हर मोदी घर घर मोदी’चा जयघोष केला.
आमदार अभय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात कमळ फुलले आहे.संपूर्ण देशातील जनता खूश आहे.राजस्थान,छत्तीसगड,मध्य प्रदेशात आमच्या पक्षाचा विजय झाला आहे.
मी 42 दिवस तेलंगणा आणि छत्तीसगडचा दौरा करून मोदींचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला.तिथल्या सर्व मतदारांना पटवून देण्याचे काम केले. 3 राज्यात आमचा पक्ष सत्तेवर आहे याचा मला खूप आनंद आहे.हा विजय मोदींमुळेच आहे.अनेक नेते अमिता शहा, बीएल संतोष यांनी मार्गदर्शन केले.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी परिश्रम घेतले.

लोकसभा निवडणुकीत आमचा पक्ष पुन्हा सत्तेत येईल, मोदी पुन्हा पंतप्रधान होणार याची खात्री आहे, जनता मोदींच्या पाठीशी आहे. काँग्रेस पक्ष भ्रष्ट असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. या निकालाने ‘पनवती कोण आहे हे जनतेने दाखवून दिले आहे असे सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला. बाइट
यावेळी महापौर शोभा सोमनाचे, नगरसेवक मंगेश पवार यांच्यासह भाजप पक्षाचे अनेक नेते जल्लोषात सहभागी झाले होते.


Recent Comments