Belagavi

विजयेंद्र यांना आम्ही तोलून मापून अध्यक्ष बनवले नाही : अरविंद लिंबावळी

Share

प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांची विरोधकांशी हातमिळवणीआहे. विजयेंद्र यांना आम्ही काही तोलून मापून प्रदेशाध्यक्ष केलेले नाही. हायकमांडने त्यांना नेमले आहे असे सांगत भाजप नेते माजी मंत्री अरविंद लिंबावळी यांनी अप्रत्यक्षपणे निवडीवर असमाधान व्यक्त केले.

बेळगावमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधताना अरविंद लिंबावळी म्हणाले की, लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्षपदाची धुरा आपल्या हाती घेतली. विधानसभा निवडणुकीत तडजोड करून काही लोक भाजपचे आमदार झाल्याचे अप्रत्यक्षपणे बी.वाय. विजयेंद्र आणि आर. अशोक यांना लिंबावळी यांनी टोला हाणला.

कांता राजा अहवाल स्त्रोत प्रत्येक संगणकात उपलब्ध आहे. त्याची चोरी करता येत नाही. समाजात जात जनगणना लागू करू नये, असे म्हणणाऱ्यांनी सामाजिक विचार करायला हवा.
घटनेनुसार जनगणनेसाठी जात येत नाही. कोणत्या जातीचे किती लोक आहेत? जाती, सामाजिक, आर्थिक या सर्व बाबींचा विचार करून कांतराज यांनी अहवाल दिला आहे. साहजिकच कोणत्या जाती मागासलेल्या आहेत, त्यांची काय परिस्थिती आहे ते बाहेर येते. त्यानंतर आपलं अस्तित्व काय, हा काहींना प्रश्न असू शकतो. याबाबत घाबरण्याची गरज नाही, असे पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. कांतराज आयोग सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये नेमला होता. त्याचा अहवाल आता आला आहे. त्याची अंमलबजावणी होऊ नये. त्यावर सभागृहात चर्चा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

Tags: