Belagavi

भगवद्गीता, रामायणात जीवनाचे मार्गदर्शक तत्वज्ञान : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

भगवद्गीता, रामायण यात जीवनाचे मार्गदर्शक तत्वज्ञान आहे. आपल्या जीवनात अर्जुनाचे ध्येय असावे, धर्मराजाचा धर्म असावा, भीमरायाचे बळ असावे, कृष्णाचे मार्गदर्शन आपल्या सर्वांना असावे, कर्णाच्या दातृत्वाबरोबरच आपण हे सर्व गुण आज अंगीकारले पाहिजेत, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

 

 बेळगावातील अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी शाळेत सोंडा स्वर्णवल्ली महासंस्थानचे भगवद्गीता अभियान आज मंगळवारी पार पडले. या अभियानात सहभागी होऊन त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, संपूर्ण जग भारताच्या संस्कृतीचा आदर करते. भगवद्गीता मोहीम बेळगावात पार पडली हा आनंद आहे. अरविंद देशपांडे हे माझे गुरू आहेत. गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामींचा हा प्रयत्न आपल्या जीवनात अंगीकारण्याची गरज आहे. आपण सर्व भारतीय आपल्या देशाचा ऐतिहासिक वारसा म्हणून सर्वत्र उल्लेख करत आहोत. भारत हा 5000 वर्षांचा वैभवी इतिहास असलेला देश आहे.

भगवद्गीता अभियानात आमच्या लहान मुलांनी भगवद्गीतेचा जप केला यावरून माझ्या देशाचे भविष्य उज्ज्वल आहे हे सांगू शकते. महाभारत, भगवद्गीता आणि रामायण हे माझे आवडते विषय आहेत. ते समजले तर जीवनाचे तत्वज्ञान समजले म्हणावे. तुम्हाला कळेल की तुम्हाला कसे जगायचे आहे आणि समाजात कसा सुसंवाद राखायचा आहे. समाजात प्रत्येकाने कसे जगले पाहिजे हे समजण्यासाठी गंगाधरेन्द्र सरस्वती स्वामीजी हे अभियान राबवत आहेत. माझ्या आयुष्यातील भूतकाळातील घटना माझ्या भल्यासाठी आहे. भविष्यात घडणाऱ्या घटनाही भविष्यासाठी चांगल्या असतील, या म्हणीप्रमाणे आपण काम केले पाहिजे. बाइट
मंत्री हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, आपल्या जीवनात अर्जुनाचे ध्येय असावे, धर्मराजाचा धर्म असावा, भीमाचे बळ असावे, कृष्णाचे मार्गदर्शन आपल्या सर्वांना असावे, कर्णाच्या दातृत्वाबरोबरच आपण हे सर्व गुण आज अंगीकारले पाहिजेत. आपल्या महान भारत देशात विविधतेत एकता सामावली आहे. अनेक जाती, विविध पेहराव, खाद्यपदार्थांचे सौंदर्य या देशात आहे, असे त्या म्हणाल्या.

भगवतगीता अभियानाचे प्रणेते शिरसी येथील श्री सोंडा स्वर्णवल्ली महासंस्थानचे श्री श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामी यांनी यावेळी भगवतगीतेचे महत्व विशद केले. मानवाचा जन्म अमूल्य आहे. जीवन जगणे हीसुद्धा एक कला आहे. मानवाचे जीवनातील आचरण, गीतेतील मार्गदर्शनाप्रमाणे असावे. माणसाने गीतेत भगवान श्रीकृष्णाने केलेल्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण करावे असे त्यांनी सांगितले.

निडसोसी श्री जगद्गुरु दुरदुंडेश्वरा सिद्ध संस्थान मठाचे डॉ. श्री निजलिंगेश्वर महास्वामी, परमपूज्य श्री चितप्रकाशानंदजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम झाला. प्रसिद्ध उद्योगपती आणि शिक्षण तज्ञ गोपाळ जिनगौडा, श्री सोंडा स्वर्णवल्ली महासंस्थान, शिरसीचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी भगवद्गीता अभियान समितीचे कार्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, सचिव एम. के. हेगडे, संचालक सुब्रह्मण्य भट उपस्थित होते.

Tags: