गृहलक्ष्मी योजनेचा निधी वितरीत करण्यात कोणतीही अडचण नाही. योजना यशस्वी होण्यासाठी कोणतीही आर्थिक समस्या नाही. एक तांत्रिक समस्या आहे जी आधीच शोधून काढली आहे. लवकरात लवकर समस्या सोडवू, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
धारवाडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, राज्यातील काँग्रेस सरकारने हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी निधी काढून ठेवला आहे. आम्ही कोणतेही विकासकाम थांबवलेले नाही. गृहलक्ष्मी योजना राबविण्यासाठी आर्थिक समस्या असल्याचे म्हणणे खोटे आहे. गृहलक्ष्मी अंतर्गत 1 कोटी 9 लाख लाभार्थ्यांना यापूर्वीच पैसे देण्यात आले आहेत. अजून 5 ते 6 लाख लोक शिल्लक आहेत. पंधरा दिवसांत तांत्रिक समस्या सोडविण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
केवळ गृहलक्ष्मी एकच नव्हे तर, गृहज्योती, शक्ती योजना, अन्नभाग्य योजनेसाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निधी राखून ठेवला आहे. मागील सरकारमध्ये टेंडर प्रक्रिया घाईघाईने झाली, एका विभागाला 2 हजार कोटी भरावे लागले. लघू पाटबंधारे विभागाचे उदाहरण घेतले तर या विभागातून दोन हजार कोटींची कामे होऊ शकतात. 2022 च्या कालावधीसाठी 1350 कोटी रुपयांचे काम सुरू करण्यात आले आहे. वर्क ऑर्डर झाली आहे. निविदा प्रक्रिया, काम झाले आहे. विभागाचे बिल येणे बाकी आहे. 22,000 कोटींची पूर्वीची सरकारी बिले प्रलंबित आहेत. विकासाची विचारणा करणाऱ्यांनी काय केले..? त्यांनी केलेल्या चुका आता आम्ही सुधारण्याचे काम करत आहोत, असे म्हणत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.


Recent Comments