Belagavi

होरट्टी यांचा मराठीद्वेष; म्हणे, महाराष्ट्र एकीकरण समिती झाली ताकदहीन

Share

सुवर्णविधान सौधच्या उभारणीने बेळगाव महाराष्ट्राला जोडण्याचे आंदोलन धुळीस मिळाले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे बळ आता पूर्णपणे कमी झाले आहे असे सांगत विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी मराठीविषयीचा आकस दाखवून दिला.

सुवर्ण विधानसौध येथे मंगळवारी अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यातील विधानसौधच्या उभारणीतून कन्नडला प्रेरणा, शक्ती मिळाली आहे. अनेक सरकारी कार्यालयेही येथे स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे बेळगावला महाराष्ट्रात समाविष्ट करण्याचे आंदोलन आता राहिलेले नाही, असे ते म्हणाले

Tags:

#innewsbelagavi #belgaumnews #belagavi #Basavaraj horrti