Belagavi

ज्येष्ठांनी आहार, आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

पूर्वी आपले पाणी, हवामान, आहार हे सर्व आरोग्यदायी होते. पण अलीकडच्या काळात खाण्याच्या सवयींमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी आहार आणि आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे महिला व बालविकास, ज्येष्ठ नागरिक सबलीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रविवारी बेळगाव येथील सीपीएडी मैदानावर अगस्त्य फाउंडेशनतर्फे आयोजित ज्येष्ठ सेवा वॉकथॉन आणि वरिष्ठ हेल्पलाइन/सेवा मित्र कार्यक्रमात सहभाग घेतला. फ्लो
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोना महामारीनंतर जगणे खूप कठीण झाले आहे. अशा वेळी, कोणावरही अवलंबून न राहता आपण स्वतःच्या वेळेनुसार चांगल्या आरोग्यासाठी आणि उत्तम श्वासोच्छवासासाठी निरोगी उपक्रमांमध्ये सहभागी होऊ या.
म्हातारपणी कोणावरही भार टाकू नये. घरात आणि समाजात निरोगी आणि प्रेमळ राहू या. बेळगावात असा आरोग्यदायी छंद जोपासणे स्वागतार्ह आहे. आपल्या बेळगावातील इतके लोक अशा मॅरेथॉनमध्ये सहभागी होताना दिसले तर बेळगाव निरोगी आहे आणि भविष्यातही निरोगी राहील असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.


यावेळी कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन केंद्राचे अध्यक्ष अडीवेप्पा बेंडीगेरी, जिल्हा ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन केंद्राचे अध्यक्ष बसवराज गोमाडी, अगस्त्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा पूर्णिमादेवी जगताप, जयभारत फाऊंडेशनचे पदाधिकारी, अशोका आयर्न ग्रुपचे सीईओ व्यंकटरमण आणि गोल्ड प्लसचे पदाधिकारी नवीन उदोशी, शशिकला कोप्पद व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

Tags: