Udupi

पुत्तिगे पर्यायोत्सव समिती महापोषकपदी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

महिला आणि बालविकास, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण खात्याच्या आणि उडुपी जिल्हा पालक मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची श्री कृष्ण मठ, उडुपीच्या श्री पुत्तिगे पर्यायोत्सव समितीचे महापोषक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी पुत्तिगे मठ येथे पर्यायोत्सवाच्या पूर्वतयारीच्या बैठकीत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पर्यायोत्सव समितीचे मुख्य महापोषक म्हणून घोषित करण्यात आले.


कार्यक्रमानंतर बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, येत्या जानेवारीत होणाऱ्या श्री पुत्तिगे पर्यायोत्सवाला राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. पुढील उडुपी दौऱ्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्राथमिक बैठक आयोजित केली जाईल असे त्यांनी सांगितले.

भगवान कृष्णाने मला श्री पुत्तिगे पर्यायोत्सवममध्ये सहभागी होण्याची संधी दिली आहे. पुत्तिगे मठ देशात आणि परदेशात प्रसिद्ध आहे. हिंदू संस्कृती ही महान संस्कृती आहे, तिचे जतन आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. पुत्तिगे मठाचे स्वामीजी परदेशात आपली संस्कृती पसरवत आहेत.पर्यायोत्सवामध्ये कोणतेही राजकारण न करता भक्तिभावाने सहभागी होऊया. परदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सर्व व्यवस्था करू असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, पुत्तिगे पर्याय समितीने माझी महापोषक म्हणून नियुक्ती केली असून, त्यानुसार या पदावर मी प्रामाणिक काम करणार आहे.

यावेळी पुत्तिगे मठाचे दिवाण नागराज आचार्य, पर्याय स्वागत समितीचे अध्यक्ष व माजी आमदार रघुपती भट्ट, स्वागत समितीचे सरचिटणीस देवीप्रसाद शेट्टी बेलापू, स्वागत समितीचे कोषाध्यक्ष रंजन कलकुर, प्रसाद कांचन आदी उपस्थित होते.

Tags: