राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे सेंट्रल रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा श्रीमती जयवर्मा सिन्हा यांची भेट घेतली आणि बेळगाव-पंढरपूर, बेळगाव-मुंबई, बेळगाव ते झारखंडमधील शिखरजी स्टेशनपर्यंत नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची आणि हंपी एक्सप्रेस ट्रेनचा प्रशांती निलयम (पुटपूर्ती) व्हाया धर्मवरण्णीचे स्टेशन असा विस्तार करण्याची विनंती केली.
रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षा जयवर्मा सिन्हा यांनी खासदारांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रस्तावांचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, असे खासदारांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे


Recent Comments