बेळगाव महापालिका कोणत्याही कारणाने बरखास्त होणार नाही, अशी ग्वाही देतानाच महापौरांच्या सहीचे पत्र परत मिळेपर्यंत पाठपुरावा करू, आमदार अभय पाटील यांनी दडपशाही थांबवावी असे जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव मनपातील बेकायदेशीर ठराव दुरुस्त्या, महापौरांच्या स्वाक्षरी असलेल्या फाईल्स गायब होणे आदी कारणांवरून बेळगाव महानगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेतली.
त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री जारकीहोळी म्हणाले की, अभय पाटील यांनी आयुक्तांना लक्ष्य करणे हा योग्य मार्ग नाही. महापौरांनी स्वाक्षरी केलेले पत्र महापालिकेला परत मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत. अभय पाटील यांच्याविरोधात दलित संघटनांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला बेळगावचा विकास झालेला हवा आहे, असे ते म्हणाले.
अभय पाटील यांनी मराठा समाजावर अन्याय केला आहे. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. पत्रकारांनी अभय पाटील यांना, तुम्ही कन्नडिग महापौर बनवणार की मराठा असा प्रश्न विचारला होता, त्यावर भाजपचा महापौर बनवणार असे उत्तर त्यांनी दिले होते. भाजप आता मराठा समाजावर अन्याय करत आहे.
ही त्यांची राजकीय नौटंकी असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार राजू सेठ म्हणाले की, सदाशिवनगर येथे पौरकार्मिक आंदोलन करत असताना त्यांची चौकशी केली असता, त्यांना पगार मिळत नसल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे त्यांना कोणी कामावर लावले ते पोलीस तपासातून कळेल, असे आमदार राजू सेठ यांनी सांगितले


Recent Comments