Belagavi

सतीश जारकीहोळींना लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रत्यूत्तर

Share

माझ्यात आणि सतीश अण्णांमध्ये कोणतीही नाराजी नाही. सतीश जारकीहोळी यांनी मला म्हैसूरला जाण्यासाठी बोलावले. माझे तिकीटही बुक झाले होते. बेळगाव जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी म्हैसूरला जाण्याचे नियोजन केले होते असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसे बेळगावचे राजकारण पुन्हा ढवळू लागले आहे. ‘काही जण बेळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करत आहेत, माझे मौन माझी कमजोरी नाही असे म्हणत सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी लक्षी हेब्बाळकर यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला होता. या मुद्द्यावर बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही, माझे मौनसुद्धा माझी कमजोरी नाही असे सांगत मंत्री सतीश जारकीहोळी यांना अप्रत्यक्षपणे कडक संदेश दिला आहे.

बेळगावात सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, जिल्हा काँग्रेसमध्ये छोटीशी अडचणही नाही. एकमेकाला जमून घेऊन आम्ही काम करत आहोत. माझ्यात आणि सतीशअण्णांमध्ये कोणतीही नाराजी नाही. बंधू सतीश जारकीहोळी यांनी मला म्हैसूरला जाण्यासाठी बोलावले. माझे तिकीटही बुक झाले होते. बेळगाव जिल्ह्यातील सर्व आमदारांनी म्हैसूरला जाण्याचे नियोजन केले होते. साखर कारखान्याच्या बॉयलर पूजेच्या पार्श्वभूमीवर मी जाऊ शकले नाही, असे सांगून त्यांनी त्यांच्यात आणि सतीश जारकीहोळी यांच्यात पडद्याआड सुरू असलेल्या कथित वादावर स्पष्टीकरण दिले.

हायकमांडने का थांबवले हे सतीश जारकीहोळी यांनाच विचारा. डीसीएम डीके शिवकुमार यांच्या बेळगाव दौऱ्यात आमदार आणि जिल्हाध्यक्षांच्या गैरहजेरीबाबत बोलताना त्यांच्या दौऱ्यात गोंधळ होता. कोणीतरी येऊन स्वागत करायला हवे होते असे हेब्बाळकर म्हणाल्या.

मी स्ट्रॉन्ग किंवा वीक रहात नाही, पक्षाची सत्तेत येण्यामध्ये हजारो-लाखो कार्यकर्त्यांचे योगदान आहे. आम्ही दौऱ्यावर गेलो तरी दुसरे सत्ताकेंद्र करण्याचा आमचा विचार नाही. समविचारी लोक असतील. यात दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही. बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी, दुफळी किंवा दुसरा गट तयार करण्याची गरज नाही असे म्हटले आहे.
संदेश पाठवायचा होता, संदेश पाठवून झाला का, या प्रश्नावर त्यांनी, संदेश वगैरे काही नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. हे काँग्रेस पक्षांतर्गत गुपित आहे. पक्षात कोणताही गोंधळ नाही. चमक देऊन गायब कसे होता येईल? आम्ही सर्व एकत्र आहोत, बहुसंख्य जनता आमच्यासोबत आहे. याचा वेगळा अर्थ लावण्याची गरज नाही. मुख्यमंत्री आहेत, प्रदेशाध्यक्ष आहेत, काही अडचण असल्यास त्यांच्या निदर्शनास आणून देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपमध्ये सर्व काही ठीक नाही असे आम्ही म्हणतो. आम्ही असेही म्हणतो की जेडीएसमध्ये दोन गट आहेत आणि सर्व काही ठीक नाही. कुमारस्वामी आणि सीएम इब्राहिम यांचा गट आहे. जर त्यांनी यांना बाहेर फेकले तर ते त्यांना हाकलून देतात. भाजपमध्ये तीन गट नाहीत असे काही नाही. आपल्यात नैसर्गिक क्लृप्ती असे काही नाही. पक्ष आला की आपण सगळे एकत्र येतो. मतभेद असले तरी जिल्ह्यात निवडणूक आल्यावर आम्ही एकत्र येऊ, असे सांगून बेळगाव काँग्रेसच्या गोटात दोन गट असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले.

Tags: