वीरशैव लिंगायतांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ते कोणाचाही द्वेष करत नाहीत. आपणही मोठे व्हावे आणि समाजातील इतर सदस्यांनाही मोठे होऊ द्यावे, असे आमचे धोरण आहे असे महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

वीरशैव लिंगायत संघटना वेदिकेच्या नेतृत्वाखाली बुधवारी बेंगळूरमधील पुट्टण्णा हॉल येथे श्री वीरभद्रेश्वर जयंती व श्री वीरभद्रेश्वर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. त्यावेळी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, वीरशैव समाज हा अन्नदासोह सोहळ्यासाठी ओळखला जातो. ओबीसी यादीत समावेशासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, ही समाजाची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.


वीरभद्रेश्वराच्या आशीर्वादाने समाजाची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. सर्वांच्या सहकार्याने आमच्या मागण्या पूर्ण करू, असे त्या म्हणाल्या. इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांचे अभिनंदन करण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद वाटतो. चांद्रयान 3 च्या यशात महिलांनीही महत्त्वाची भूमिका बजावली ही अभिमानाची बाब आहे. शास्त्रज्ञांनी कौटुंबिक जीवनापासून दूर राहून रात्रंदिवस काम केल्यामुळे आज संपूर्ण जग भारताच्या यशाचा उत्सव साजरा करत असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.
तुमकूरच्या सिद्धगंगा मठाचे श्री सिद्धलिंग महास्वामी समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री काडसिद्धेश्वर मठ, नोनविनकेरे येथील करीवृषभ देशिकेंद्र शिवयोगीश्वर महास्वामी, कोडलीपेट येथील किरीकोडली मठाचे डॉ. श्री सदाशिव महास्वामी, गौरीगड्डे आश्रमाचे विनय गुरुजी, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.


Recent Comments