बैलहोंगल व खानापूर तालुक्यांसाठी समर्पक बस सोडण्यात याव्यात या मागणीसाठी भीमसेनेतर्फे बेळगावात आज आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक मार्ग परिवहन महामंडळातर्फे खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यांना समर्पक बससेवा नसल्याने नागरिकांचे विशेषतः शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे या तालुक्यांना पुरेशी बससेवा देण्याच्या मागणीसाठी भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण मादार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी बेळगाव बसस्थानकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करून लक्ष वेधले.
यावेळी बोलताना भीमसेनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष प्रवीण मादार म्हणाले की, बैलहोंगल तसेच खानापूर तालुक्यातील सुलारप्पाहळ्ळीसह अनेक गावांसाठी बस व्यवस्था चांगली नाही. विद्यार्थ्यांना रोज 5 ते 11 किमी पायी चालत जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शाळा-कॉलेजला जाण्यास उशीर होत आहे. अनेक वर्षांपासून बैलहोंगल व खानापूर तालुक्यातील बस व्यवस्था चांगली नसून हा जनतेवर व विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. केएसआरटीसीच्या बैलहोंगल व बेळगाव आगाराच्या नियंत्रणाधिकार्यांनी तातडीने बस सुरू करण्याची मागणी केली.
बेळगावच्या मध्यवर्ती बसस्थानकावरही भीमसेनेतर्फे परिवहन विभागाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. फ्लो
या निदर्शनात सर्वम मादार, विजय कोटकार, जिल्हा कार्याध्यक्ष मल्लाप्पा अक्कमट्टी, उदय सूजी आदींनी भाग घेतला.


Recent Comments