Belagavi

खानापूर, बेळगाव तालुके दुष्काळी जाहीर करा, अन्यथा बेमुदत आंदोलनाचा इशारा

Share

खानापूर व बेळगाव हे तालुके अवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करून लवकरात लवकर दुष्काळी मदत द्यावी, अन्यथा बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा नेगीलयोगी रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील यांनी दिलाय.

बेळगावात बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना नेगीलयोगी रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील म्हणाले की, गेल्या 15 दिवसांपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून 25 सप्टेंबरपर्यंत खानापूर व बेळगाव तालुके दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारकडे केली होती.

27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत खानापूर व बेळगाव तालुक्यातील दुष्काळाची पाहणी केली. मात्र पाच दिवस उलटून गेले तरी अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता हे तालुके दुष्काळपीडित म्हणून घोषित करण्यासाठी आम्ही सरकारला ऑक्टोबर 11 तारखेपर्यंतची मुदत देऊ. त्या मुदतीत दोन्ही तालुके दुष्काळपीडित जाहीर करून शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई न दिल्यास तीव्र बेमुदत

आंदोलन करणार असल्याचा इशारा नेगीलयोगी रयत संघाचे प्रदेशाध्यक्ष रवी पाटील यांनी दिला.
पत्रकार परिषदेला नेगीलयोगी रयत संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: